top of page
ring.webp

Hallmark in Detail

हॉलमार्क केलेल्या सोन्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे सोने किती कॅरेटचे आहे हे त्यावर लिहिलेले असते. याशिवाय दागिन्यांमध्ये किती टक्के सोने आहे, याचीही नोंद दागिन्यांवर केली जाते. यानंतर कोणताही ज्वेलर्स (सोनार) हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

हॉलमार्किंगचे फायदे

सरकारमान्य दागिना

 हॉलमार्कचे त्रिकोणी बोधचिन्ह भारत सरकार द्वारे BIS संस्थे मार्फत प्रमाणित करण्यात आले आहे. सराफांकडील प्रत्येक दागिना हा सरकारमान्य लॅबोरेटरी मध्ये तपासल्या जातो आणि त्यावर त्याच्या शुद्धते नुसार कॅरेट नमूद करण्यात येते.

उदा. पीवर दागिन्याला 24K 995 असे नमूद केलेले असावे

शुद्धतेची हमी

आम्ही घडवलेला प्रत्येक दागिना हा GOVT. BIS लॅब मध्ये तपासूनच शोरूम मध्ये उपलब्ध केला आहे. दागिना घेतेवेळी त्यावरचा हॉलमार्क व त्याची शुद्धता तपासूनच आपण खरेदी करावा.
हि प्रक्रिया संपूर्ण भारतभर सारखीच लागू आहे, त्यामुळे ग्राहकांना आता सर्वत्र सारखीच शुद्धता उपलब्ध असेल.

सर्वत्र उपलब्धता

VJB हे नियमानुसार हॉलमार्कचे अधिकृत दालन आहे आणि असे अधिकृत दालन आता सर्वत्र भारतात उपलब्ध आहेत. शोरूम च्या बाहेर व आत BIS चे मानचिन्ह (LOGO) व BIS चा लायसन नंबर आपण तपासून अधिकृत असल्याची खात्री करू शकता.

BIS च्या website वर सुद्धा त्याची नोंदणी पाहता येते
http://bit.ly/3IgeYPj

योग्य परतावा

हॉलमार्क लागू झाल्यामुळे दागिन्यांची गुणवत्ता पूर्वीपेक्षा वाढली आहे. या नियमाआधी, गुणवत्तेचा प्रमाण नसल्याने, परतावा करते वेळी सुवर्णकाराने सांगेल तेच मान्य करून परतावा घ्यावा लागत असे. पण हॉलमार्क मुळे आता आपल्याला गुणवत्ता माहिती आहे आणि ते नमूद सुद्धा आहे. त्यामुळे आता त्याचा परतावा हा त्याच्या शुद्धते नुसारच मिळतो आहे.

सरकारी संकेतस्थळ

भारतीय मानक ब्युरोने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर उत्पादनाच्या मान्यताप्राप्त चाचणी आणि हॉल मार्किंग केंद्रांची यादी टाकली आहे. तुम्ही https://huid.manakonline.in/MANAK/HallmarkingHomePage या लिंकवर क्लिक करून ही यादी पाहू शकता.

BIS काय म्हणते?

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनुसार, ग्राहकाने अशा दुकानांमधून सोने खरेदी केली पाहिजे जिथे दुकानाबाहेर, नोंदणीकृत ज्वेलर्स, विक्रीसाठी हॉलमार्क केलेले दागिने उपलब्ध या शब्दांसह BIS लोगोसह प्रदर्शित केलेल असेल.

+91.8928.444.700

©2022 by VJB Gold  विष्णू जगन्नाथ भालेराव 

bottom of page